शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मित्राचा फुकटचा सल्ला

रमेश... मानसोपचार तज्ज्ञाकडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला जातो..... 
डॉक्टर :- काय त्रास आहे. 
रमेश :- डॉक्टर साहेब रोज रात्री झोपताना मला भिती वाटत राहते की, माझ्या बेड खाली कोणीतरी लपलंय आणि त्या मुळे मला झोप लागत नाही....
डॉक्टर :- या साठी तुम्हाला सलग सहा महिने इलाजा साठी दर आठवड्यात दोन वेळा माझ्या कडे यावे लागेल. 
रमेश :- तुमची एकावेळची फी किती?
डॉक्टर :- तीन हजार... 
सहा महिन्यांनी डॉक्टर रस्त्याने जात असताना त्यांना रमेश दिसतो.
डॉक्टर :- अहो,,,, काय झाले तुम्ही पुन्हा इलाज करून घेण्यासाठी आला नाहीत.. 
रमेश :- माझ्या मित्राने माझ्यावर इलाज केला आणि जवळपास लाखभर रुपये वाचवले..
डॉक्टर :- काय सांगताय... असा काय उपाय केला तुमच्या मित्राने.. 
रमेश :- काही नाही... बेड विकून गादी खाली टाकून झोपायला सांगितलं... 
 
Morel of story is.....
डॉक्टर कडे जाण्यापूर्वी आपल्या समस्या "मित्रां" समोर उघड करा....