शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (08:45 IST)

डोळ्याची शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य

डोळा मारायचा नाही 
कशावरही डोळा ठेवायचा नाही 
डोळ्यात डोळा घालून पहायच नाही 
दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळं पाहायचं नाही 
वर डोळे करायचे नाहीत 
डोळ्यात अंजन घालायचे नाही (दुसऱ्याच्या )
डोळे भरून पहायचे नाही 
कानाडोळा करायचा नाही 
डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत 
डोळे वटरायचे नाहीत 
काळा चष्मा घालून वावरायचे म्हणजे आपल्या डोळ्यात काय आहे ते कोणाला समजणार नाही.
सर्वात महत्वाचे बायकोने  डोळे वटारून पाहिले तर, तिच्या डोळ्याला डोळा‍ भिडवायचा नाही, नाही तर परीणाम वाईट होऊ शकतात व पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ येईल. 
वाचताना माझा डोळाच भरून आला!!!