रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (15:23 IST)

नागपंचमी निमित्त जोक्स मराठी

नागपंचमीला खोट्या नागाला पूजणारे
सर्वांना मनापासून सल्ला
घरातील त्या नागिणीची पूजा करा
जी तुमच्यावर दररोज फणा काढते
 
लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा!
 
नाग म्हणाला नागीणला
माझं तुझ्यावर खूप जीव आहे
नागीण म्हणाली-माझा विचार मनातून काढून टाक
माझा प्रियकर एनाकोंडा आहे
 
नागाप्रमाणे सतत फणा काढणाऱ्या
माझ्या मित्रमंडळींना
नागपंचमीच्या शुभेच्छा!
 
बायकोच्या नुसत्या आवाजावर
डुलणाऱ्या 'त्या' प्रत्येक नागोबाला
नागपंचमी'च्या भरभरुन शुभेच्छा!
 
दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे 
विष प्रयोग करून 
स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या 
विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा
 
माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
नागपंचमीच्या शुभेच्छा!
 
आपल्या मध्येच राहून
आपल्याला फणा दाखवून 
फुस करणाऱ्या नागांना 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा