शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पिठोरी अमावस्या

पिठोरी अमावस्या
 दिन आनंदाचा आज
मातृदिनाचे महत्व
लेवू संस्कारांचा साज
 
करूनिया मातृपूजन
होऊ माऊलिचे भक्त
घडविताना मुलांना
माय आटविते रक्त
 
आई संस्कारांची खाण
कधी थकणार... नाही 
ती सुखाची सरीता
ऋण फिटणार नाही
 
सण बैलपोळ्याचा आज
सर्जा राजाला सजवा
घास... पुरणपोळीचा
 त्यांना प्रेमाणे भरवा
 
कोसळती श्रावणधारा 
धरणिमायही नटली 
हिरवाईचा नेसून शालू
नववधूसम भासली
 
पिठोरी अमावस्या 
हिंदू संस्कृतीचा वारसा
भाव-भक्तिने भरला
आज मनाचा आरसा
 
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा.