Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"सासू"

Updated: शनिवार, 7 एप्रिल 2018 (13:37 IST)
 
स्त्री म्हणून मर्यादा शिकवणारी, 
चुकलं तर शिक्षिकेसारखी समजावून सांगणारी, 
ह्यात साखर नाही हो, ह्यात गूळ घालायचा, 
त्यात पाणी नाही हो, वाफेवरच शिजवायचा, 
अन्नपूर्णा गृही नंदण्यासाठी तरी, 
सासू प्रत्येकीला मिळावी.. 
 
भाजलं, लागलं तर प्रेमाने फुंकर घालणारी, 
वेळ प्रसंगी, असं चालत नाही म्हणून दटावणारी, 
आईच्या मायेने सुनेला जवळ घेणारी, 
दमलीस का गं.. म्हणून घोटभर चहा देणारी, 
माया आईची, धाक बाबांचा असं अजब रसायन असणारी, 
घरातली करती सासू सर्वांनाच मिळावी.. 
 
प्रेमाचा हा झरा प्रत्येकीच्या वाट्याला येत नाही, 
सासूच्या रूपातील आई सर्वांनाच मिळत नाही, 
असेल पुर्व पुण्याई तरच लाभते छत्रछाया तिची, 
नाहीतर सासरी येऊन, सून कायमची पोरकी.. 
नाहीतर सासरी येऊन, सून कायमची पोरकी..

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळील कमी प्रसिद्ध पण ५ सुंदर ठिकाणे

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

पुढील लेख
Show comments