शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जून 2018 (11:25 IST)

काल मी पावसाला विचारलं तुझं वय काय?

काल मी पावसाला विचारलं
तुझं वय काय? 
 
पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,
 
जर तू पावसात सैर वैरा
आनंदात धावत असशील
तर माझं वय १०
 
जर तू पावसात 
कविता लिहित असशील
तर माझं वय १६
 
जर तुला पावसात 
विरह जाणवत असेल 
तर माझं वय १८
 
जर तुला पावसात 
ट्रेकिंग ला जावंस वाटत
असेल तर माझं वय २४
 
जर तुला पावसात 
गजरा घ्यावासा वाटत असेल
तर माझं वय ३०
 
जर तुला मित्रांसोबत
पावसात भिजत भजी
खावी
असं वाटत असेल 
तर माझं वय ४०
 
मग मी पावसाला म्हणालो
"अरे एक काय ते वय सांग,
 शब्दात गुंतवू नकोस!"
 
पाऊस स्मितहास्य देऊन म्हणाला,
पाऊस तू जसा अनुभवशील
तेच माझे वय!!