वडील शब्द कसा बनला असावा...
उगाच बसल्या बसल्या मी विचार करतोय, वडील शब्द कसा बनला असावा ते शोधतोय.
मी माझ्या त्या महान पित्याकडे पहातोय, वडाचे भले मोठे झाड डोळ्या समोर येतंय.
उन्हात, पाऊसात स्तब्ध, शांत झाड दिसतंय, योगी पुरुषासारखं, शांत ऊभा दिसतंय.
सर्वांना ऊन्हात सावली देणारं ते झाड पहातोय.
त्याला कुणाची सावली नाही, पाऊसात संरक्षण नाही.
ऊन्ह,पाऊस,दिवस,रात्र स्वत: सोसून आपल्याना संरक्षण...
किती किती महान आहे हे वडाचे
झाड.
काय फरक आहे या वड़ाच्या झाडात अणि वडीलात ???
मला वाटतं, वड़ पासून शब्द
वडील बनला असावा.
समजायला वेळ झाला हो.ssss
झाड पडलं माझं ...
आत्ता स्वत: झाड व्हावं लागलं ..
तेंव्हा कुठे हे समजलं.......
(हा लेख कोणी लिहला माहीत नाही
सलाम आहे लेखकाला ..)
पण ज्यांचे वडील आज जिवंत आहेत
त्यांची काळजी घ्या ..
खूप महत्त्वाचा आहे हा वड
आपल्यासाठी ..