शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

हल्ली मी ठरवलंय, स्वत:ला जपायचं

हल्ली मी ठरवलंय,
स्वत:ला जपायचं,
स्वत: मधल्या स्वत:लाचं,
प्रेमानं गोंजारायचं..
 
जिथं गुदमरतो श्वास,
तिथं नाही थांबायचं,
हसावं वाटलं तर,
खळखळून हसायचं..
 
नाकावरल्या रागालाही,
जरूर येऊ द्यायचं,
रडावं वाटलं,
तर स्वत:च स्वत:चा खांदा व्हायचं..
 
मी कशी दिसतेय,
कुणालाचं नाही विचारायचं,
आरशात स्वत:ला पाहातं,
स्वत:च मुरकायचं..
 
कधीतरी असंच,
खूप आळशी व्हायचं,
मलाही “ change “ हवाच की,
स्वत:लाचं बजावायचं..
 
मित्रमैत्रिंणींबरोबर मिळून,
खूप खूप बागडायचं,
वय असो कितीही,
नेहमी तरूणच राहायचं..
 
जाड वा बारीक, गोरी वा काळी,
नेहमी सुंदरच दिसायचं,
मनाच्या सौंदर्यालाही,
मनापासून जपायचं..
 
स्त्रीत्वाला आपल्या,
ना ग्रुहित धरू द्यायचं,
स्वावलंबी होऊन, ताठ मानेनं,
चालतचं राहायचं..
 
बकेट लिस्ट तरी का बनवावी 
जे  मनात येईल ते करून मोकळे व्हावे 
आपल्या इच्छा आपणच पूर्ण करायच्या 
         मी ठरवलंय ...