असतोस तु जेव्हा तु माझ्याबरोबर  
					
										
                                       
                  
                  				  असतोस तु जेव्हा तु माझ्याबरोबर
	आत्मविश्वासपूर्ण असतो माझा वावर
	तुझ्याशिवाय जगु शकत नाही मी क्षणभरही
				  													
						
																							
									  
	जिथे जिथे मी जाते तिथे असतोसच तु माझ्याबरोबर
	तु सोबत असताना स्वच्छ, स्पष्ट माझी नजर
	तु नसताना कसं अंधारल्यासारखं, चैतन्यहिन
				  				  
	तुझ्याशिवाय माझी दुनिया मलीन
	प्रत्येक बाबतीत मी तुझ्याच अधीन
	पूर्वी तु सोबत असताना खुप लाज वाटायची
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	लोकहि  माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची
	पण आता मला काहिच वाटत नाही त्याचे
	त्यांच्याही लक्षात आलेय आपलं परस्परावलंबन
				  																								
											
									  
	वयपरत्वे तुझी माझी घट्ट होत जातेय मैत्री