मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या टेबलावरील संवाद

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:
 
दोन पुरुष: 
 
१- काय रे आज गवार का?
 
२ - हो, आणि तुझे?
 
१ - मेथी
 
संपलं.
 
 
 
दोन स्त्रिया:
 
१ - काय गं आज गवार का?
 
२ - अगं त्याचं काय झालं, आज यांच्या ऑफिसात होती पार्टी.. तर..
 
१ - अगं बाई, प्रमोशन बिमोशन झालं की काय?
 
२ - नाही गं, कसलं आलंय प्रमोशन, ते काहीतरी अवार्ड मिळालं म्हणे कंपनीला, नाव विसरले बघ, असो.. तर हे म्हणाले आज दुपारचा डबा नको.. 
 
१ - अगं बाई, म्हणजे सकाळचा वेगळा डबा नेतात की काय?
 
२ - चल, काहीही तुझं, पुढं ऐक, मग मी म्हटले बरं झालं आधी सांगितलं.. काम वाचलं माझं. नाहीतर आपण सकाळी उठून सगळं करायचो आणि हे ऐनवेळी डबा नको म्हणतात.. शिवाय यांच्या भाज्या ठरलेल्या बटाटा, मेथी, शेपू, बेसन, मटकी. जरासं वेगळं काही करायचं म्हटलं की यांचं तोंड कारल्याहून वाकडं
 
१ - अगदी खरंय, आमच्याकडेही हीच तऱ्हा. पोरांचे वेगळे कौतुक आणि यांचे वेगळे नखरे.. 
 
२ - हो ना, जीव दमून जातो नुस्ता. आमच्या ह्यांनाही गवार आवडत नाही ना, म्हणून मग मी आज केली डब्याला. अशीही पडून राहते आणि भाज्या किती महाग झाल्यात, त्याचं काय पडलंय कुणाला
 
१ - आणि रोज रोज काय नवीन करायचं अगं.
.
२ - नाहीतर काय.. आणि तू काय आणलं? 
 
१ अगं काल रात्री आवरायला खूप वेळ गेला, झोपायलाही उशीर झाला आणि नेमकं आजच आमच्या सासूबाईंना जायचं होतं बाहेर सक्काळी सक्काळीच, म्हणून जरा जास्त लवकर उठावं लागलं.. त्यात लाईटही गेले, सगळं पाणी गॅसवर ठेवावं लागलं, पोरांनाही उशीर झाला नेमका स्कुलला
 
२. आत्ता गं बाई..
 
१. हो ना, आणि यांची फर्माईश आली.. मेथीचे पराठे कर.. मग काय केले आणि भाजीही केली थोडी.. तीच घेऊन आले...
.
.
.
.
.
 
 
 
संपलं नाहीये अजून... 
संपत नसतं हे कधी.....