शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (11:08 IST)

तुम्ही हे केलंय का..??

कितीही मोठे झालात तरी बापाला कधी मिठी मारली का..?
नसेल मारली तर नक्की मारा..
बघा बापाला नक्की रडू येईल...!
 
कितीही मोठे झालात तरी
आईच्या मांडीवर नक्की झोपा
बघा आई नक्की गोंजारेल...!
 
कितीही गैरसमज झाला तर लहान भावाला एक प्रेमळ हाक मारा
बघा नक्की धावत येईल...!
 
कितीही रुसली तरी फक्त एकदा 
तायडे बघ ना माझ्याकडे बोला
बघा सगळा रुसवा विसरून जाईल...!
 
कितीही थकली तरी फक्त एकदा मिठीत घेऊन कपाळाचा चुंबन घ्या
बघा बायकोचा सगळा थकवा जाईल...!
 
कितीही त्रास झाला तरी फक्त बायकोला एकदा जवळ घेऊन डोळ्यात डोळे घालून बोला
आई आहे आपली थोडं सहन कर
बघा सासूला पण आई म्हणते की नाही...!!
 
कितीही भांडण काढलं तरी आईला एकदा जवळ घेऊन बोला
थोडं समजून घे ग आई..
बघा सुनेला पण लेक करून टाकते की नाही...!
 
कितीही हट्ट केला तरी
जवळ घेऊन पोराला सांगा आता पैसे नाहीत उद्या घेऊ आपण
बघा पोर परत हट्ट करणार नाही...!
 
कितीही चिडला तरी
फक्त एकदा नवऱ्याला सांगा खूप प्रेम करते..
बघा सगळा राग क्षणात जातो की नाही ते....!!!
 
आयुष्यात अशी खूप नाती न बोलल्यामुळे दूर जातात...
फक्त एक वाक्य त्याला खूप वेगळं वळण देते..!
फक्त बोलून दाखवा....!!
बघा सगळं ठीक होत की नाही ते...!!