साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा आणि तुमचे भविष्य
मेष : व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल.मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवोदित कलाकारांना सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक आवक वाढेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. व्यावसायिक कामात यश मिळे. नोकरीत वरीष्ठांचा पाठिंबा मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश संपादन कराल. आपले पूर्वनियोजित कार्यक्रम विनासायास मार्गी लागतील. कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. लेखक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक यांना चांगल्या संधी चालून येतील. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल.