शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2014
Written By वेबदुनिया|

कन्या राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

WD

संपूर्ण वर्षभर गुरूची तुम्हाला साथ लाभणार आहे. तुमच्या हिशेबी, चिकित्सक व व्यवहारी स्वभावाला साथ देणारे ग्रहमान आहे. मात्र विचारांच्या जंजाळातच गुंतून न पडता प्रत्यक्षात कृती करण्याचे धोरण ठेवा. गुरूचे दशम व लाभ स्थानातील भ्रमण तुम्हाला यशप्राप्ती करून देणारे आहे.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी...


धंदा, व्यवसाय व नोकरी

WD


व्यापार-उद्योगात एका मोठ्या संक्रमणाची नांदी करणारे वर्ष आहे. जो व्यवसाय किंवा उद्योग सध्या चालू आहे त्यातील कार्यपद्धती बदलेल, पण त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. जूननंतर पूर्वी केलेल्या कामातून किंवा प्रॉपर्टीतून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील. त्याची दीर्घ मुदतीच्या स्वरूपात फेरगुंतवणूक करावीशी वाटेल. हे सगळे चांगले असले तरी तुम्हाला सतत एक प्रकारचा दबाव जाणवत राहील. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात आर्थिक धोके पत्करू नका. मुलांची अभ्यासातील प्रगती चांगली असेल. उच्च शिक्षणाकरिता किंवा कामाकरिता ज्यांना देशात अथवा परदेशात जायचे असेल त्यांना संपूर्ण वर्ष चांगले आहे.

पुढे पहा गृहसौख्य व आयोग्यमान ...


गृहसौख्य व आयोग्यमान

WD


तरुणांना करिअरमधील प्रगती उत्तेजित करीत राहील. कौशल्य वाढविण्याकरिता त्यांना प्रशिक्षण घ्यावेसे वाटेल. नवीन वर्षात गुरुचे भ्रमण दशमस्थानात आणि लाभस्थानात असल्यामुळे वैवाहिक जीवनातील गृहसौख्याच्या तुमच्या कल्पना दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. मार्चपर्यंत एखादी चांगली बातमी कळेल किंवा घटना घडेल. घरातील वयोवृद्ध व अनुभवी मंडळीबरोबर संघर्ष न करता खेळकर दृष्टिकोन ठेवून मिळेल ते पदरात पाडून घ्याल. फेब्रुवारी, मार्च तसेच जुलै, ऑगस्टमध्ये प्रकृतीची काळजी घ्यावी. कन्या रास ही द्वीस्वभावी गुणधर्माची, पृथ्वी तत्त्वाची आहे. तिचा अधिपती बुध आहे व चिन्ह अविवाहित मुलगी आहे. शुभरंग करडा, शुभरत्न पाचू व आराध्य दैवत गणपती-कृष्ण आहे.