तूळ राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल
गुरूचे भाग्यस्थानातील आणि दशमस्थानातील सौख्यकारक भ्रमण हीच तुमच्या नवीन वर्षात जमेची बाजू आहे. मंगळाचे व्ययस्थानातील आणि राशीतील भ्रमणल तर राशीतील शनीचे वास्तव्य तुम्हाला एका संस्मरणीय पर्वातून वाटचाल करायला लावणार आहे. आहे तो क्षण आंनदाने जोपासण्याची दृष्टी ठेवा. अभ्यासू व जिज्ञासू दृष्टिकोन ठेवून वागण्याच्या तुमच्या सवयीला पोषक असेच ग्रहमान यंदा लाभलेले आहे. छंद आणि व्यासंग चांगल्या तर्हेने जोपसले जातील.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी...
धंदा, व्यवसाय व नोकरी
जानेवारी, फेब्रुवारीत पैशाची उभारणी कराल. व्यापार-उद्योगात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्या कामातून फायदा होत नाही असे काम बंद करून त्या जागी दुसरे काम सुरू करावेसे वाटेल. कारखानदारांना नवीन तंत्रमान स्वीकारावे लागेल. जुने करार संपून नवीन करार होतील. परदेशातील कामला चालना मिळेल. संपूर्ण वर्षभर पैसे मिळूनही पैशाविषयी चिंता राहील. प्रकाशक व लिखाण क्षेत्रातील लोकांना चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यापार्यांना पुढील दीपावलीपर्यंत बरेच काही साध्य करता येईल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान