धनू राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू, दशमस्थानाकडे येणारा मंगळ आणि लाभस्थानातील शनीचे वास्तव्य हे सर्व तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे विचार आचारांना सतत चालना मिळणार आहे. गाठीला काही महत्त्वाचे अनुभव ठेवून वागलात तर फायदा तुमचाच होईल. केव्हा क्रांतिकारक विचारांनी भारावून जाल, तर केव्हा अगदी व्यवहारी भाषेत बोलाल, मात्र गुरूची साथ जूनपर्यंत चांगली लाभत असल्यामुळे तुमच्याकडून काही चांगले कार्य सहज घडतील.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी
व्यापार उद्योगात काहीतरी नावीन्यपूर्ण करावे ही तुमच्यातील इच्छा तुम्हाला वर्षभर कार्यरत ठेवेल. संपूर्ण वर्ष आर्थिकदृष्टया बरकत करणारे ठरेल. देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडून कामात नोकरदार व्यक्तींना त्यांचे कौशल्य पणाला लावून उत्तम कामगिरी करता येईल. संस्थेच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. बदली किंवा थोडी गैरसोय जूननंतर संभवते. अतिश्रमामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. महिला आपली जबाबदारी उत्तम पार पाडू शकतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
गृहसौख्य व आरोग्यमान