शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2015
Written By वेबदुनिया|

आज तुमचा वाढदिवस आहे (23.01.2015)

ज्या व्यक्तींचा मूलक 5 असतो, ते व्यक्ती फारच भाग्यशाली असतात. असे व्यक्ती मितभाषी असतात. कवी, कलाकार व अनेक विद्यांमध्ये निपुण असतात. यांच्यात गजबची आकर्षण शक्ती असते. अनोळख्या व्यक्तींना मदत करण्यासाठी हे लोक सदैव तयार असतात. यांच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करणे फारच कठिण असते. जर हे लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर कुणीही वाईट संगतीत त्यांना आणू शकत नाही पण जर तुमच्या स्वभावात वाईटपणा असेल तर जगातील कुठलीही ताकद तुम्हाला सुधारू शकत नाही. पण अधिकतर 5 तारखेला जन्म घेणारे व्यक्ती सौम्य स्वभावाचेच असतात. 

शुभ दिनांक : 1, 5, 7, 14, 23

शुभ अंक : 1, 2, 3, 5, 9, 32, 41, 50

शुभ वर्ष : 2030, 2032, 2034, 2050, 2059, 2052

ईष्टदेव : महालक्ष्मी, गणपती

शुभ रंग : हिरवा, गुलाबी, जांभळा, क्रीम

कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 5, 14, 23 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम असेल. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून यश मिळवाल. लेखनकार्य करणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष सुखद जाणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष अनुकूल राहील. उद्योग-धंद्यात सहयोगाने यश मिळेल. नोकरी करणार्‍यांना संतोषजनक वातावरण मिळेल. आर्थिक, पारिवारिक वेळ अनुकूल असेल. प्रकृती उत्तम राहील. महत्त्वाच्या कामानिमित्त यात्रेचा योग घडेल. ऐकून हे वर्ष संमिश्र राहील.

मूलक 5चे प्रभावशाली व्यक्ती
* संजय गांधी
* सुभाषचंद्र बोस
* शेक्सपियर
* अभिषेक बच्चन
* रमेश सिप्पी
* भाग्यश्री
* दीपिका पादुकोण