साप्ताहिक राशीभविष्यफल (01 फेब्रुवारी ते 07 फेब्रुवारी 2015)
मेष : अचानक धनलाभ संभवतोसप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ संभवतो. त्यामुळे लॉटरी वगैरे माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. धनलाभ होऊ शकतो व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे नियोजित खर्चापेक्षा अधिक प्रमाणात खर्च करावा लागेल. काही बाबतीत जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. मनस्ताप संभवतो.
वृषभ : उद्योग क्षेत्रातील समस्या मिटतीलसप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील बहुतेक समस्या मिटतील व व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. आपले सहकार्य इतरांच्या उपयोगितेचे सिध्द होऊ शकेल व सर्वत्र यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात कोणत्याही क्षेत्रात अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. मित्रमंडळींचे आवश्यक स्वरूपाचे सहकार्य वेळेवर मिळेल. जवळचा प्रवास योग घडून येईल. मिथुन : धार्मिक यात्रायोग घडेलसप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहील. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागेल व काळजीचे सावट मिटण्याच्या मार्गी लागेल. अंतिम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील घटना व घडामोडी भावी काळाच्या दृष्टीने लाभदायक स्वरूपाच्याच ठरतील. व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहून मनावरील काळजीचे दडपण दूर होऊ शकेल.
कर्क : वाहन पीडायोग संभवतोसप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये. इतरांवर अधिक विश्वासून राहणे अहितकारक स्वरूपाचेच ठरू शकेल. काळजीचे सावट वाढेल. शांतता व संयम ठेवणे उचित ठरेल. अंतिम चरणात मनोनुकूल स्वरूपाचा प्रवास योग घडून येईल व प्रवास कार्यसाधकच ठरेल. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊन उत्साह वाढेल.
सिंह : भागीदारीमधून लाभ घडेलसप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा असणारा लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा, भावी काळासाठी लाभप्रद ठरू शकेल. अंतिम चरणात यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला फक्त ऐकणेपुरताच र्मयादित ठेवणे आवश्यक व उचित ठरेल.
कन्या : आरोग्य चांगले राहीलसप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या दृष्टिक्षेपात राहील. विरोधकांचा त्रास व ससेमिरा काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधकच ठरेल. अंतिम चरणात भागीदारीत असणारे वाद मिटतील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. इतरांकडून आवश्यक स्वरूपाचे असणारे सहकार्य वेळेवर मिळेल. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतीने होऊन पूर्ण होतील.
तूळ : परीक्षेत यश मिळेलसप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत मनोनुकूल यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. हातात पैसा खेळताच राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही व सर्वत्र यश मिळेल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास पाठीमागे राहील. त्यामुळे त्यांना बोट ठेवण्यास जागा रिक्त राहणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक व उचित ठरेल व होणारा मनस्ताप टळेल.
वृश्चिक : पारिवारिक आनंद वाढेलसप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. आपले मदतकार्य सहकारी वर्गाला विशेष उपयोगी स्वरूपाचेच सिध्द होईल व सर्वत्र विजयी मार्गावरून वाटचाल राहू शकेल. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास या सप्ताहामधील कालखंड भावी काळाच्या दृष्टीने लाभदायकच ठरू शकेल.
धनू : सहकार्य लाभेलसप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग व कार्यालयीन सहकारी वर्गाकडून योग्य व अपेक्षित सहकार्य मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील व यश मिळण्याचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल व अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. कार्यसभोवतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहून काळजीचे सावट दूर होईल.
मकर : आर्थिक आवक वाढेलसप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येईल व आर्थिक समस्या मिटतील. काही बाबतीत अल्पशा प्रयत्नाने व सहज केलेले प्रयत्न सफलतेच्या मार्गावर राहतील. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी यश मिळवून देणारीच राहील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून मानसिक अशांतता दूर होऊन शांतता लाभेल.
कुंभ : मानसिक समाधान लाभेलसप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक शांतता व समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाचा प्रवास कार्यसाधक स्वरूपाचाच सिध्द होऊन काळजी मिटेल व अपेक्षित कार्यहेतू साध्य होईल. अंतिम चरणात अपेक्षित पैसा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. दीर्घकालपर्यत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडेल व कार्यक्षेत्रात मानसन्मान, गौरव योग जुळून येईल व आनंद वाढेल.
मीन : अनावश्यक खर्च घडेलसप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्वक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयम ठेवणे आवश्यक व उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी सुधारेल व मनाला दिलासा मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. यशस्वितेसाठी केलेले अथक परिश्रम सार्थकी ठरतील व यश दृष्टिक्षेपात राहील.