मिथुन राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल राहणार आहे. म्हणून हे वर्ष तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरणार आहे.
तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी काही करण्याची इच्छा मनात बाळगली असेल तर तुमच्या प्रयत्नांना निश्चितच यश मिळणार आहे. तुमची घोडदौड जोमाने व यशस्वी राहील. शुक्रासारखा आनंदी ग्रहसुद्धा तुम्हाला बराच काळ साथ देईल. थोडक्यात येत्या वर्षात तुमच्या यशाचे प्रमाण प्रयत्नांवर अवलंबून असणार आहे. एकूणच या काळात तुम्हाला जॅकपॉट मिळेल. संपूर्ण वर्षच प्रेमाप्राप्तीसाठी अनुकूल आहे.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापार उद्योगात सध्या जे काम चालले आहे त्याल गती देण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्नशील राहाल. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि तुम्हाला बदल हवा असेल तर काही अधिक चांगले मिळविण्यासाठी हा योग्य काळ आहे.
त्यामुळे एखादी नवीन संधी चालून आली तर अजिबात सोडू नका. फेब्रुवारी ते मे 2015मध्ये कामात विशेष फायदा होईल. उत्पादन व नफ्याचा नवीन उच्चांक प्रस्थापित करू शकाल. जुलैपासून पुन्हा एकदा काहीतरी नावीन्यपूर्ण काम केले पाहिजे असे तुम्हाला प्रकर्षाने वाटेल. बँक किंवा इतर मार्गाने पैसे उपलब्ध झाल्यामुळे आर्थिक अडचण भासणार नाही.
दुसरीकडे, व्यावसायिकांना थोडे अधिक कष्ट करावे लागतील, पण लक्षात ठेवा, कष्टांचे फळ हे चांगलेच असते. त्यामुळे 2015 सालच्या मिथुन राशीची कुंडली हेच सांगते की, कष्ट करण्यात अजिबात कचरू नका. विद्यार्थ्यांबाबत सांगायचे झाले तर त्यांना चांगले निकाल मिळतील. ज्यांना स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांनी जानेवारीपासून सुरुवात करावी. बेकार व्यक्तींना नोकरीची संधी दारी येईल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक जीवनात आरोग्यसुद्धा स्थिर राहील. तुम्ही खूप वर्षांपासून एखाद्या आजाराचा सामना करत असाल तर त्यात या वर्षी सुधारणा झालेली दिसून येईल. वृद्धांची मनोकामना पूर्ण होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. महिला आवडीच्या क्षेत्रात चमकतील. पूर्वी ठरलेला एखादा शुभसमारंभ जानेवारी किंवा मार्च ते जुलै या कालावधीत पार पडेल. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल. नवविहाहितांना घरात एखादी शुभवार्ता कानावर येईल. आर्थिक स्थैर्य राहील. कलाकार आणि खेळाडूंना त्यांच्या मनाप्रमाणे चांगले काम करून चाहत्यांची मने जिंकता येतील.
शुभ रंग : हिरवा, पिळवा
शुभरत्न : पाचू
आराध्यदैवत : पांडूरंग
उपाय: लहान मुलींची सेवा करा.