मीन राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल
मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष उत्तम प्रकारे सुरू होईल. सर्व महत्वाचे ग्रह अनुकूल राहणार आहेत, त्यामुळे सर्व आघाड्यांवर तुमची घोडदौड जोमाने व यशस्वी राहील. स्वप्ने साकार होतील. शनीसारखा कठोर ग्रह आता राशीबदल करून भाग्यस्थानात येणार आहे. या शनीने जवळजवळ गेले तीन वर्ष तुमची विविध प्रकारे सत्त्वपरीक्षा पाहिली. अपेक्षित आणि अनपेक्षित प्रश्नांना तुम्हाला समोरे जाणे भाग पाडले आता त्यातून तुमची सुटका होणार असा विश्वास बाळगून पुढे आगेकूच करा. मिळणार्या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा, हे तुम्हाला ठरवायचे आहे. कामाच्या अनुषंगाने नवीन अनुभव येतील.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापारीवर्गाला नशिबाची साथ मिळाल्याने तुमचे अनेक अंदाज व आडाखे बरोबर येतील. तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. फेबु्वारी ते मे 2015 मध्ये कामात विशेष फायदा होईल. उत्पादन व नफ्याचा नवीन उच्चांक प्रस्थापित करू शकाला. प्रतिस्पर्ध्यांवर संपूर्ण वर्ष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कामानिमित्ताने मे ते ऑगस्ट 205 दरम्यान परदेशवारीही होईल. त्यानंतरच्या कालावधीत भावनिक निर्णय टाळा. तुमचे सर्व विचार आणि भविष्यातील बेत गुप्त राहणे चांगले, नाही तर जुलैनंतर स्पर्धकांनाच त्याचा फायदा मिळेल. नोकरीत वरिष्ठांनी पूर्वी काही आश्वासने दिली असतील तर त्याची पूर्तता मार्चपूर्वी होऊ शकेल. एप्रिल ते जून या काळात चांगले काम करून वरिष्ठांचा आणि संस्थेचा विश्वास संपादन करता यईल. ज्यांना स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांनी नवीन वर्षापासून सुरवात करावी. बेकार व्यक्तींना नोकरीची संधी दारी येईल. नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी तुमची भूमिका सावध ठेवा.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभकार्य पार पडेल. तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे. असे असेल तरी एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या उद्धट वागणुकीचा तुम्हाला त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. केतूचा प्रभाव वाढता राहिल्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. अशा वेळी तुमच्या आहाराच्या सवयींवर लक्ष ठेवणे आवश्यक राहील. या काळात तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवा. प्रेम प्रकरणांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. पण सातव्या घरात असलेला राहू हे फार चांगले चिन्ह नाही. त्यामुळे प्रेम आणि विश्वास हे दोन घटक नेहमीच अत्यंत महत्त्वाचे राहतील. तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. असे असले तरी कष्ट आणि जबाबदारी यात वाढ होईल. कलाकार आणि खेळाडूंची निराशा कमी करणारे वर्ष आहे. त्यांना चांगली संधी मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचा उपयोग होईल. पण त्यांनी स्वत:ता तणाव मर्यादेबाहेर वाढवू नये.
शुभ रंग : हिरवा
शुभरत्न : पाचू
आराध्यदैवत : पांडुरंग
उपाय: देवळात तांदूळ, गूळ आणि मसूर यांचे दान करा.