Kargil Vijay Diwas: हे वीर सपुतांनो विसरू कसें तुमचे बलिदान
हे वीर सपुतांनो विसरू कसें तुमचे बलिदान,
हुतात्मा जाहलेत तुम्ही, कार्य तुमचे महान,
उभा देश ताठ मानेने, केवळ तुमच्यामुळेच,
श्वास मोकळा आम्ही घेतो, परीणाम हे त्याचेच,
तमा न कशाची असते तुम्हा, देशभक्ती नसानसांत,
अभिमान कित्ती आम्हास तुमचा,आहोत सदैव तुमच्या ऋणात,
बघितले कारगिल जेंव्हा, उर भरून आला,
कसें लढले असाल तुम्ही, अश्रूंचा पूर डोळ्यात आला,
आहुती तुमची कधीच रे जवाना, न जाईल व्यर्थ खरं हेच!
जाणीव ह्याची सदैव स्मरणात ठेवून वागले पाहीजेच,!
....मानाची मानवंदना!!
अश्विनी थत्ते.