आजीचे स्मार्ट मनोगत
कोण म्हणते आजीची आता जवळ आली साठी
'साठी साठी' म्हणालात तर आजी देईल पाठीत काठी
आजी आता करते मॉर्निग walk आणि हेवी ब्रेकफास्ट
आता मुळी ती करत नाही कुठलाही फास्ट
नातवंडा बरोबर पळापळ चालू असते नेहमी
नातवंड पळवतात चष्मा म्हणून नाही लावत चाळीशी
डायबेटीस, बीपी,गुडघेदुखी बद्दल शब्द ही काढतं नाही
सगळे आपलेच मित्र मैत्रिणी म्हणून कुरकुर करत नाही
आजी हल्ली निवडत नाही गहू तांदूळ,n पाले भाजी
सर्वांसाठी मस्त करते पिझ्झा n पावभाजी
आजी हल्ली वळत नाही सहाणेवर वाती
क्रिकेट मॅच बघत बघत दृढ करते नातीगोती
पार्लर मध्ये नित्य करते फेशिअल n लेटेस्ट हेअरकट
आजोबा जरी ओल्ड झाले तरी आजी रहाते नेहेमी स्मार्ट
आजची आजी ड्रेस ,जीन्स, टी शर्ट सगळे enjoy करते छान
Young champs बरोबर गप्पा मारत रहाते मस्त ' चिरतरुण'