शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

कधी कधी....

-सुधाकर रिठे

ND
मुलांसाठी मोठ्यांनी
कधी कधी लहान व्हावं
त्यांनी विचारल्या प्रश्नाला
त्यांच्याच शब्दात उत्तर द्यावं
विचार करायला लावणारे
त्यांचे प्रश्न असतात

उत्तर देता देता
मोठेपणा विसरायला लावतात
म्हणून मुलांसाठी वेळ द्यावा.
त्यांना तेवढच बरं वाटतं
त्यांची उत्तरे देता देता
लहान झाल्यासारखं असतं !