नव्या उजेडाने
- प्रा. साईनाथ पाचारणे
|
घरे भरू या
नव्या सुगंधाची
फुले फुलवुया
|
नवे दप्तर
नव्या पुस्तकातून
नवी अक्षरे वाचू या
|
नवी भाषा
नव्या ओळखीने
नवे नाते जोडू या
|
जग सारे
नवे आकाश
नवे तारे
| |
|
बासरीतून
नवे सूर
गाऊ या !
