बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

एकीचे बळ

baal katha
एक गृहस्थाचे पाच मुले होते. पण त्या भावंडाचे आपसात कधीच पटायचे नाही. त्यांच्यात सतत भांडण, वाद होत राहायचे. हे पाहून बाप दुखी असायचा. त्यांना अनेकदा उपदेश करूनही काही फरक पडला नाही तेव्हा एके दिवशी त्या गृहस्थाने आपल्या पाचही मुलांना आपल्या जवळ बोलावले. प्रत्येकाच्या हातात हातभर लांबीची एक-एक काठी देऊन ती मोडण्यास सांगितले. प्रत्येकाने वडिलांच्या आज्ञेप्रमाणे ती मोडली.
नंतर त्या गृहस्थाने प्रत्येक मुलाला दोरीने बांधलेल्या पाच-पाच काठ्या दिला आणि मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र आल्यामुळे पाच मुलांनाही ती मोळी मोडता आली नाही. हे बघून गृहस्थ म्हणाला बघितलंत मुलांनो! एकीचे बळ किती असते ते! 
 
वडिलांच्या हे बोलण्याचे सुज्ञ मुलांनी समजून घेतले आणि तेव्हापासून ते न भांडता एकजूटीने वागू लागले.