मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

आइसक्रीम

एकदा एका 10 वर्षाचा मुलाला आइसक्रीम खाण्याची इच्छा झाली. तो एका दुकानात गेला आणि टेबलाजवळ बसून वेटरला आपल्या आवडत्या आइसक्रीमची किंमत विचारली. तेव्हा वेटर म्हणाला 30 रुपये. ते ऐकून मुलगा आपल्या हातात असलेल्या नोटा मोजू लागला. नंतर त्याने एक 25 रुपय्यांची आइसक्रीम खरेदी केली. वेटर ने ती त्याला आणून दिला आणि मुलाने स्वाद घेत आइसक्रीम खाल्लं. बिल भरून तो तिथून निघून गेला.
नंतर वेटर ती टेबल स्वच्छ करायला तर तो थक्कच झाला. त्याचे मन हेलावून गेले कारण टेबलावर तो मुलगा 5 रुपये टीप म्हणून ठेवून गेला होता. आइसक्रीमची ऑर्डर करतानाच त्याने वेटरचा विचार केला होता. आणि आपल्या लहान मनाने तो मन जिंकून गेला. कारण त्याने केवळ स्वत:चा विचार न करता दुसर्‍यांसाठी विचार केला.