लघू कथा : गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक हत्ती राहायचा.त्याला आपल्या शरीरावर आणि शक्तीवर खूप गर्व होता.वाटेत कोणताही प्राणी भेटला तर त्याला त्रास द्यायचा आणि घाबरवायचा. एकदा तो रस्त्याने चालला होता. रस्त्यात एका झाडाखाली त्याला एक पोपट बसलेला दिसला.व त्याला म्हणाला मला नमस्कार कर. पोपट नाही म्हणाला. हत्तीला राग आला व त्याने ते झाड उपटून टाकले. पोपट उडून गेला त्याला पाहून हत्ती हसायला लागला. मग एके दिवशी हत्ती पाणी पिण्यासाठी नदीकाठी गेला. तिथे मुंग्यांचे घर होते. एक मुंगी स्वतःसाठी अन्न गोळा करत होती. हे पाहून हत्तीने विचारले की तू काय करते आहे? यावर मुंगी म्हणाली, पावसाळा येण्याआधी स्वत:साठी अन्न गोळा करत आहे, जेणेकरून पावसाळा कोणत्याही अडचणीशिवाय निघून जाईल. हे ऐकून हत्तीने आपल्या सोंडेत पाणी भरले आणि मुंगीवर ओतले. पाण्यामुळे मुंग्यांचे जेवण खराब झाले. हे पाहून मुंगीला खूप राग आला आणि तिने हत्तीला धडा शिकवण्याचे ठरवले.
एकदा हत्ती झोपलेला होता. मुंगी हळूच हत्तीच्या सोंड मध्ये शिरली आणि त्याला आतमधून चावायला लागली. ज्यामुळे हत्तीला खूप दुखायला लागले. हत्ती रडायला लागला व मदत मागायला लागला. पण कोणीही त्याला त्याच्या स्वभावामुळे मदत केली नाही. आता मुंगी हत्तीच्या सोंड मधून बाहेर आली. हत्तीने मुंगीची माफी मागितली.हत्ती आता पूर्णपणे बदलला. व त्याने ठरवले की, तो आता कोणालाही त्रास देणार नाही व सर्वांची मदत करेल.
तात्पर्य : आपल्या शक्तीवर कधीही अहंकार करू नये.
Edited By- Dhanashri Naik