रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

पौराणिक कथा : श्रीकृष्णाच्या मुखात ब्रह्मांड

Sree Krishna Jayanthi Wishes in Malayalam
Kids story: ही त्यावेळेची कहाणी आहे जेव्हा दुष्टांना शिक्षा करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी कृष्ण घेतला होता.  व्दापार युगातील ही घटना भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणाशी जोडलेली आहे. जेव्हा ते नंदगावात माता यशोदेच्या सानिध्यात मोठे होत होते. त्यावेळी त्यांच्या नटखट स्वभावाची चर्चा पूर्ण वृंदावन मध्ये होती. 
 
एकदा भगवान श्री कृष्ण घराबाहेर अंगणात खेळत होते. त्यावेळी त्यांचे मोठे भाऊ बलराम म्हणजे दाऊ हे आले व त्यांनी पाहिले की, कान्हा अंगणात मातीमध्ये खेळत आहे. बाळकृष्णाची तक्रार घेऊन दाऊ माता यशोदा कडे गेलेत. दाऊ म्हणाले मैया तुमचा लल्ला मातीमध्ये खेळत आहे. 
 
हे ऐकताच माता यशोदा अंगणात गेली व म्हणाली की, लल्ला तू माती खाल्लीस का? बाळकृष्ण म्हणाले की, नाही मैया मी माती खाल्ली नाही. आता माता यशोदाला नटखट बाळकृष्णावर विश्वास बसला नाही. व त्या म्हणाल्या की,  कान्हा तोंड उघड आणि मला दाखव तू माती खाल्लीस का? माता यशोदाचे ऐकून बाळकृष्णने आपले तोंड उघडले व माता यशोदा आश्चर्यचकित झाल्या. माता यशोदाला बाळकृष्णच्या तोंडात माती तर दिसली नाही पण संपूर्ण ब्रम्हांड दिसले. माता यशोदाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत न्हवता. त्या छोट्या बाळकृष्णच्या तोंडात संपूर्ण सृष्टी पाहत होत्या. हे पाहून माता यशोदा बेशुद्ध पडल्या. जेव्हा माता यशोदाचे डोळे उघडले तर त्यांच्या मनात बाळकृष्ण प्रति आणखी जास्त प्रेम निर्माण झाले. त्यांनी बाळकृष्णला मायेने जवळ घेतले व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता मात्र माता यशोदाला खात्री झाली की, त्यांचा बाळकृष्ण कोणी साधारण नाही तर स्वतः सृष्टीचे स्वामी आणि परमात्माचे अवतार आहे. 

Edited By- Dhanashri Naik