1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : गुरूवार, 19 मे 2022 (08:15 IST)

पालीला पळवून काढण्यासाठी काही सोप्या टिप्स

lifestyle
घरात पाल दिसली की पूर्ण घर त्याला पळवून लावण्यासाठी त्याच्या मागे फिरतं. पाल बघितले की अंगावर किळस आणि शिसारी येते. बरेच लोक तर पालीला एवढे घाबरतात की पाल एका खोलीत असेल तर त्या खोलीत जात नाही. पाल घरातून बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगत आहोत ज्यांना अवलंबवून घरातील पाल बाहेर काढू शकता. चला तर मग जाणून घेऊ या उपाय.
 
1 अंडीचे टरफले -
पाली अंडीच्या वासापासून लांब राहतात. दारावर खिडक्यांवर अंडीचे टरफल ठेवून द्या. त्याच्या वासामुळे पाल घरात येणार नाही.
 
2 लसूण -
लसणाच्या वासाने देखील पाल दूर पळते. पालींना घरापासून लांब ठेवण्यासाठी घरात लसणाच्या पाकळ्या लोंबकळतं ठेवा किंवा घरात लसणाच्या रसाचा स्प्रे करा. 
 
3 कॉफी आणि तंबाखू पावडरच्या गोळ्या ठेवा- 
कॉफी आणि तंबाखू पावडर मिसळून लहान लहान गोळ्या बनवा आणि आगपेटीच्या कांडी वर किंवा टूथपिक वर चिटकवून द्या आणि कपाटात अशा ठिकाणी ठेवा जिथे नेहमी पाल दिसते. हे मिश्रण त्यांच्या साठी प्राणघातक असते म्हणून ते हे खाऊन मरतात. 
हे काही सोपे उपाय केल्याने घरातून पाल नक्की बाहेर निघेल आणि पुन्हा कधीही येणार नाही.