बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (08:25 IST)

किचन टिप्स : या स्मार्ट पद्धतीमुळे आपले स्वयंपाकघर मोठे होईल

स्वयंपाकघर घराचा तो भाग आहे जिथे स्त्रिया जास्त वेळ घालवतात. बऱ्याच वेळा किचन व्यवस्थित ठेऊन देखील ते अस्तव्यस्त वाटतो कारण जागेचा अभाव असतो. जर आपण आपल्या लहानशा स्वयंपाकघराला अधिक मोठे करायचे असल्यास आम्ही काही टिप्स घेऊ आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* भिंतीचा स्मार्ट वापर करा- 
स्वयंपाकघरामध्ये कपाटात भांडी ठेवल्याने जास्त जागा जाते. जर आपल्याला  किचन मध्ये जास्त जागा पाहिजे असल्यास भांडी भिंतीवर लटकवा. या साठी आपण हूकचा वापर करू शकता. या मुळे स्वयंपाकघरात जागा होईल आणि भांडीसुद्धा सहज मिळतील. 
 
* स्वयंपाकाचे शेल्फ वापरा-  
सिंक मुळे किचनशेल्फ देखील अव्यवस्थित वाटते आणि भांडी ठेवायला त्रास होतो. अशा परिस्थितीत काम करताना सिंकवर लाकडी बोर्ड ठेवा असं केल्याने जागा वाचेल आणि स्वयंपाक करताना काहीच त्रास होणार नाही. 
 
* नीट नेटकं सामान रचा- 
स्वयंपाकघरातील सामानाला व्यवस्थित ठेऊन आपण स्वयंपाकघर चांगले बनवू शकता. प्रत्येक वस्तूला व्यवस्थित नीटनेटकं जमवून ठेवा. लहान कपाट असेल तर त्यात लहान डबे ठेवा. छोटा ड्रॉवर असेल तर त्यामध्ये सुरी,चमचे ठेवा आणि वेळ पडल्यावर त्या मधून काढा आणि त्यातच परत ठेवा. असं केल्याने स्वयंपाकघर जास्त घाण होणार नाही. आणि जागा पण पुरेल.  
 
* स्लायडिंग ट्रे लावा- किचन च्या शेल्फ मध्ये लाकडी बॉक्स लावून त्यामध्ये वेगवेगळ्या स्लायडिंग ट्रे लावू शकता. या मध्ये गरजेच्या वस्तू जसे की चमचे, ग्लास,मसाले ठेवू शकता. या मुळे सर्व सामान एकाच ठिकाणी राहील आणि आपल्याला जागा कामी पडणार नाही. 
 
* स्वयंपाकघरात लहान ड्रॉवरला विभागून दोन करा आणि त्यात सामान ठेवा. किचन लहान वाटणार नाही. प्रत्येक ड्रॉवरमध्ये वेगवेगळी भांडी ठेवा. 
 
* स्वयंपाकघरात खिडकी असावी- 
स्वयंपाकघर मोकळे आणि हवादार असण्यासाठी एक खिडकी बनवा. या मध्ये हँगिंग शो पीस लावून किंवा प्लांट लावून सुशोभित करू शकता.  
 
* कॅबिनेटचा खालचा भाग- 
केबिनेटच्या खालील बाजूस जागा असल्यास त्यामध्ये बॉक्स लावून घ्या. हे कचराकुंडी प्रमाणे काम करेल आणि वेगळी कचरा कुंडी ठेवण्याची गरज पडणार नाही. 
 
* भिंतींचा रंग देखील चमत्कार करतो- 
किचनच्या भिंतींना पांढरा, फिकट पिवळा, किंवा गुलाबी रंग द्यावा. या मुळे किचन मध्ये जास्त जागा असल्याचे जाणवेल या सह आपण गडद रंगाचे कपबोर्ड बनवू शकता. किंवा रंगाच्या ऐवजी भिंतींवर टाइल्स देखील लावू शकता. 
या काही ट्रिक्स अवलंबवून आपण स्वयंपाकघराच्या भिंतींना मोठे बनवू शकता.