शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (09:15 IST)

काही सोप्या कुकिंग टिप्स जे कुकिंग करणे सोपे करतात.

* इडली मऊ बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात साबुदाणा आणि उडीद डाळ वाटून घाला इडली मऊ बनते.
 
* रायतं बनवताना त्यामध्ये मीठ नंतर घाला रायतं आंबट होणार नाही.
 
* तिखटाच्या डब्यात किंवा बरणीत हिंग घालून ठेवा तिखट खराब होणार नाही.
 
* मूग, मोठं किंवा हरभरे मोड आणताना त्याला एका सूती कपड्यात बांधून फ्रीजमध्ये ठेवा, असं केल्याने त्यात आंबूस वास येणार नाही.
 
* साखरेच्या डब्यात चार ते पाच लवंगा टाकून ठेवा या मुळे त्यात मुंग्या होणार नाही .
 
* मेथीच्या भाजीचा कडवटपणा दूर करण्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ घालून ठेवा मेथीचा कडवटपणा नाहीसा होईल.
 
* दुधापासून खवा करताना गॅस मोठा करावा खवा पांढरा बनेल. 
 
* मटार भाजीत घातल्यावर दाणे टवटवीत राहण्यासाठी पाण्यात एका चमचा साखर घालून मटार उकडवून घ्या आणि ग्रेव्ही घालताना पाण्यासह घाला.
 
* खीर करताना दूध पातळ आहे किंवा कमी आहे त्यात थोडेसे तांदूळ वाटून घाला.
 
* कस्टर्ड करताना साखरेसह मध घाला त्याची चव दुप्पट होईल.