शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: रविवार, 7 मार्च 2021 (09:00 IST)

सोप्या किचन टिप्स आवर्जून अवलंबवा

कुकिंग ला सोपे बनविण्यासाठी काही टिप्स अवलंबवा 

* वाटलेले मसाले नेहमी मंद आचेवर शिजवा. या मुळे रंग आणि चव चांगली येते.
 
* ग्रेव्ही चविष्ट बनविण्यासाठी या मध्ये थोडी साखर मिसळा.
 
* मसाले दह्यात मिसळण्यासाठी दही चांगल्या प्रकारे फेणून घ्या. नंतर  
त्यात मसाले घाला.
 
* भाजी चिरायला नेहमी चॉपिंग बोर्डचा वापर करा. संगमरमरी
स्लॅब वर चाकूची धार कमी होतें.
 
* घरात तयार केलेल्या आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त दिवस चांगली ठेवण्यासाठी त्यात 1 लहान चमचा गरम तेल आणि मीठ मिसळा. 
 
* अन्न पुन्हा -पुन्हा गरम करू नका. या मुळे त्यात असलेले पोषक घटक नाहीसे होतात.  
 
* फरशीवर अंडी पडले असेल, तर त्यावर मीठ घालून काही वेळ तसेच ठेवा. नंतर पेपरने किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. अंडीचे डाग नाहीसे होतात.