बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (16:36 IST)

या लहान -लहान चुका करतात आपल्या नॉन-स्टिक भांडींना खराब

बऱ्याच दिवसापासून घरात नॉन-स्टिक वापरले जात आहे. हे नॉन- स्टिक भांडे वापरण्याचा सर्वात मोठा फायदा असा की या मुळे आपल्याला स्वयंपाक करणे सुलभ आणि सहज होते. हरभराच्या पिठाचा शिरा करावयाचा असेल किंवा ऑमलेट करावयाचे असेल किंवा इतर कोणती डिश करावयाची असेल तर या भांड्यांवर चिटकत नाही. त्यामुळे आपण सहजच अन्न शिजवू शकतो. एवढेच नव्हे तर जे लोकं आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहे आणि आहारात कमी तेल वापरण्यास प्राधान्य देतात. त्यांच्या साठी देखील नॉन-स्टिक पॅन वर अन्न शिजवणे चांगले मानले जाते, कारण या साठी आपल्याला कमी तेल आवश्यक असते. आपल्यातील काही चुका नॉन-स्टिक पॅनच्या कोटिंग ला खराब करतात. चला तर मग त्या चुकांबद्दल जाणून घेऊ या.
* धातूची भांडी वापरणे -
 स्वयंपाक करताना भाजी शिजवण्यापासून पोळी किंवा पॅनकेक शेकण्यासाठी आपल्याला चमच्याची गरज असते. तथापि काही बायका या साठी धातूच्या चमच्यांचा वापर करतात. या मुळे आपला नॉन-स्टिक पॅन खराब होतो. धातूच्या चमच्यांनी पॅन वर स्क्रॅच केल्यामुळे त्याच्या वरील कोटिंगला नुकसान होत. म्हणून नेहमी लाकडाच्या किंवा नॉनस्टिकसाठी मिळणाऱ्या वेगळ्या चमच्यांचा वापर करावा.
* अधिक उष्णतेवर अन्न शिजवणे - 
नॉन-स्टिक पॅन वर अन्न शिजवताना कधी ही अधिक उष्णता वापरू नका. या मुळे दोन तोटे संभवतात. प्रथम हे की अधिक उष्णता नॉन-स्टिकच्या कोटिंगचे नुकसान करू शकते. दुसरं असं की हे हानीप्रद टॉक्सिन सोडतात, या मुळे आपल्या आरोग्यास नुकसान संभवतो.
* पॅन गरम करणे -
 जर आपण नॉन-स्टिक भांड्यांचा वापर करत असाल तर आपल्याला हे करणे टाळावे की कधीही नॉन-स्टिक पॅन वर तेल किंवा तूप टाकण्यापूर्वी प्री-हीट किंवा गरम करू नये. जर आपण असं करत असाल तर या पासून हानीप्रद टॉक्सिन बाहेर पडतात.
* कुकिंग स्प्रे वापरणं -
आपणास आपले नॉन-स्टिक पॅन वर्षोनुवर्षे तसेच राहावे असं वाटत असल्यास आपण देखील अशी चूक करू नका. जर आपण नॉन स्टिक पॅन वर अन्न शिजवत असाल तर त्या वर कुकिंग स्प्रेचा वापर करू नये. कुकिंग स्प्रे सतत वापरल्याने ते पॅन वर जमून बसत आणि मग त्यांना स्वच्छ करणं अवघड जातं. त्या ऐवजी आपण तेल किंवा लोणी वापरू शकता.