गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2020 (21:02 IST)

आवश्यक माहिती: भाज्यांना सेनेटाइज कसे करावे, सोपे 5 उपाय जाणून घ्या

सध्याच्या काळात कोरोनामुळे सगळे चिंतीत आहे. या जीवघेण्या संक्रमणापासून सगळे आपआपल्यापरीने वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. या साठी स्वच्छतेची काळजी सर्व घेतच आहे. त्यामुळेच आपणं संसर्गापासून वाचू शकतो. 
 
घराच्या आणि स्वतःच्या स्वच्छते बरोबरच खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरून खाण्यापिण्याचे पाकीट तसेच भाज्या आणल्यावर त्यांना सेनेटाइज (निर्जंतुक नाशक) करणे महत्त्वाचे आहे. कारण ह्या संसर्गाचे विषाणू कुठेही जाऊन बसतात. दुधाचे पाकीट तर आपणं सेनेटाइज करू शकतो. पण भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना स्वच्छ करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवावे. पण या भाज्यांना आपणं सेनेटाइज कसे करू शकतो. हे जाणून घेणे आवश्यक आहे. 
 
भाज्यांना सेनेटाइज करण्यासाठीचे काही खास टिप्स :
 
1 सर्वप्रथम पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकावं. या मध्ये सर्व भाज्यांना टाकून धुऊन घ्यावे. नंतर नळाच्या पाण्याखाली अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन टाकावे. त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवावे.
 
2 पाण्यामध्ये 1 कप ऍपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मीठ घालावे. या पाण्याने सर्व भाज्या धुऊन घ्यावा. नंतर चांगल्या पाण्याने अजून 1 वेळा धुऊन घ्यावा.
 
3 पाण्यात बेकिंग सोडा आणि ऍपल व्हिनेगर टाकावे. या पाण्यात भाज्यांना चांगल्या प्रकाराने चोळून चोळून धुऊन घ्यावे. या नंतर गरम पाण्यात अजून 1 वेळा या भाज्यांना धुऊन घ्यावे.
 
4 गरम पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मीठ टाकावे. या पाण्यात भाज्यांना टाकून स्वच्छ करा. नंतर भाज्यांना नळाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. 
 
5 गरम पाण्यात मीठ आणि व्हिनेगर टाका. ह्या मध्ये भाज्यांना टाकून चोळून चोळून धुवावे. नंतर या भाज्यांना स्वच्छ पाण्याने अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे.   
अशा प्रकारे आपण भाज्यांनासुद्धा सेनेटाइज करू शकतो.