शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. प्रेमाची गोष्ट
Written By वेबदुनिया|

आगळी वेगळी प्रेमकथा

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.
आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचं न टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.

ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.
तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.
मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.
तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती."
आणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.
कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.
शेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.
सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.
त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.
तो चक्क आंधळा होता.
तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"
तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.
त्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.
तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."
ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली.