रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

आस्कींग फॉर डेट...

आज मुशुने ठरवलेच होते की काहीही करून तिला बोलायचे आणि मनातील सर्व काही सांगायचे पण तसा योगायोग येत नव्हता. तिच्याबद्दल मुशुने सर्व माहिती गोळा केली होती. ती कुठे राहते वडील काय करतात. तेव्हा कळले की ती शहराच्या पीएसआय ची मुलगी आहे आणि तिला डीएसपी व्हायचे आहे. त्याने पी.एचडी केली होती तिच्यावर. 

WD


एकदा कॉलेजमध्ये क्लास संपल्यावर मुशु बाहेर थांबला होता. तेव्हा ती समोरून येत होती. तिला पण मुशु आवडायचा ती एक शेवटी मुलगीच ना. मुशु कॉलेजमध्ये तो हुशार होता. मुशुही तिला रोज पाहत असे आणि तीही त्याला पाहत होती. परंतु मुशुचे मन खुप घाबरत होते. रेल्वेसारखे धडधड करत होते. कसे सांगावे कसे थांबवावे. मनामध्ये एक उत्कर्ष भावना होती. पण तेवढीच भीतीही होती. कधीही मुशु तिला बोलला नाही. तो तिच्याकडे पाहतच असायचा आणि ती समोरून निघून जायची परंतु तोंडामध्ये मुशुच्या धुळ जात होती. अचानक तिने मुशुला पाहिलं आणि म्हणाली अरे काय रे मुशु इथे का थांबलास मुशु हसला आणि म्हणाला नाही असेच उगी आणि तु कुठे जात आहेस. मी क्लासला जात आहे. तेव्हा मुशुने पटकन विचारले आपण कधी एकत्र कॅन्टीनला जाऊ काही तरी खाऊ तेव्हा ती म्हणाली आता नको. माझा क्लास आहे. संध्याकाळी जाऊ या हा घे माझा नंबर मला कॉल कर. तिने त्याला नंबरची चिठ्ठी दिली. तेव्हा तिचा हात मुशच्या हाताला लागला. तेव्हा मुशुचे सर्व अंग गुदगुदले. मुशुने विचारही केला नव्हता ते घडले मनामध्ये लाडु फुटत होते. त्याला जणू लॉटरीच लागली होती. त्याला डांस करावे असे वाटत होते. प्रत्यक्षात नाचलाही. तेव्हा हा त्याचा माकडपणा पाहून दोन मुली फीदी फिदी हसत होत्या.

WD
ती निघून गेली आपला मनमोहक सुगंध सोडून तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला भानच नव्हते. त्याला फक्त आठवण संध्याकाळची होती. त्याला प्रत्येक सेकंद दिवसासारखा वाटत होता. शेवटी संध्याकाळ झाली. मुशुने तिला फोन केला. फोन पटकन उचलला गेला जणू तिही त्याच्या फोनची वाट पाहत होती. मग दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले आणि एका टेबलवर जाऊन बसले. त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला. आणि गप्पा सुरू झाल्या. मित्रापासून ते शिक्षकापर्यंत त्यांच्या गप्पा सुरू होत्या. जगाचे त्यांना भानच राहिला नाही. मधोमध कधी दोघांची नजरभेट व्हायची पण ती जाणूनबुजून नजर चुकवायची. मुशुने नजर चुकवली तर पुन्हा ती त्याच्याकडे पाहायची. जेवण संपला तास संपला. दीडतास झाला तरी दोघे निघायच्या प्रयत्नात नव्हते. मग तिनेच शेवटी म्हटलं आता आपण निघूया. बील ऑर्डर झाली मुशुने बील घेतले काऊंटरवर गेले मुशुकडे एक ५०० ची नोट आणि सुटे १६० रुपये होते. तिला मोठेपण दाखवण्यासाठी त्याने ५०० ची नोट काऊंटरवर दिली. वापस फक्त १० रुपये आले. त्याने मनामध्ये बील पाहिला त्यावर ४९० रुपये. त्यात स्पेशल पिझ्झा ४९० रुपये फक्त असे लिहिले होते. ते १० रुपये पैसे परत घेऊन ते बाहेर आले. मुशुने म्हटलं मला तुला काही सांगायचं आहे. त्याच तू वाइट मानू नकोस तेवढ्यात ती मुशुकडे पाहून म्हणाली आपण उद्या याच हॉटेलमध्ये भेटूया भैय्या... आणि ती अ‍ॅटोमध्ये बसून निघून गेली. मुशु त्या ऑटोकडे पाहतच राहिला. त्याचा हात आपल्या पँटच्या खिशातील १७० रुपयांवर गेले आणि चेह-यावर एक हास्य होतं...