रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

प्रेम' पूर्व नियोजित नसते!

'प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे. 
गालिब म्हणतात...

''प्रेम ऐसा आतिशी जज्बात है, जो सप्रयास लगता नहीं है और सप्रयास बुझता नहीं है।''

''यह तो बस, होता है तो हो जाता है। नहीं होता है, तो नहीं होता है।''

हिर- रांझा, लैला- मजनू, राधा- कृष्‍ण यांच्यातील 'प्रेम' हे पूर्व नियोजित नव्हतेच! त्याला इतिहास साक्ष आहे.

'प्रेम' 'दिले से' होत असते. प्रेमात व्यक्ती नाही तर भावनांना महत्त्व असते. आपल्या भावना जुळल्या म्हणजे प्रेमाचे फुल अलगद उमल असतं. असे देश, धर्म, जाती, भाषा, परंपरा व संस्कृती यांची बंधने, मर्यादा झुगारून लावत असतं. प्रेमाची एक भाषा असते. प्रेम करणारे ती भाषा जाणतात, बोलतात. प्रेमात जात, चेहरा, वय पाहिले जात नाही तर मन पाहिले जाते. 

'न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन,

जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन।'

मात्र, आजची पिढी... आज 'ही' तर उद्या 'ती' असा प्रेमाचा बाजार मांडताना दिसतात. गाढव प्रेमाचा खेळ खेळतात. त्यांचा क्षणाचा खेळ हा त्याच्या आयुष्यभराच्या वेदना होऊ शकतात, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.