शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (13:50 IST)

लग्नापूर्वी आणि नंतर प्रत्येक जोडप्याने ही सात वचने पाळली पाहिजेत

आधुनिक युगात प्रेम करणे तितके कठीण नाही, प्रेमात राहण्यापेक्षा प्रेम टिकवणे अधिक कठीण आहे. अशा स्थितीत अनेक वेळा जोडप्याच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम असते, पण छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. जर सात फेऱ्यांनंतर नात्यात प्रेम नसेल तर परिस्थिती आणखी वाईट होते. अशा परिस्थितीत, आपण आधुनिक काळानुसार अशी काही आश्वासने घेणे अत्यंत महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्या नातेसंबंधात परस्पर समज वाढेल. आम्ही तुम्हाला असे 7 शब्द सांगत आहोत -
 
मी तुझ्या प्रायव्हेसीचा सन्मान करेल
प्रेमात मी आणि तू हे मिळून आम्ही होतं हे खरं आहे तरी रिलेशनशिपमध्ये पार्टनरला स्पेस देणं गरजेचं आहे, ज्यात त्याचं स्वत:चा विकास होऊ शकेल. पार्टनरच्या प्रायव्हेसीची काळजी न करुन सतत त्याला चिकटून राहणे योग्य नाही.
 
मी तुझ्या कामाचा सन्मान करेन
आम्ही लहाणपणापासून ऐकले आहे की कोणतेही काम लहान-मोठं नसतं. अशात आपला पार्टनर कोणत्याही प्रोफेशनमध्ये असला तरी त्याचा सन्मान केला पाहिजे. त्याचा मेहनतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हे.
 
तुझे स्वप्न पूर्ण करण्यात मी तुझी मदत करेन
प्रतिभा, मेहनत यासोबत लक्ष वेधण्यासाठी आपल्या लोकांची साथ हवी असते. अशात पार्टनरला स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्याची मदत करावी. आपले लहान प्रयत्न देखील त्यांना मोटिवेट करतील.
 
मी नेहमी तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकेन
आपल्या पार्टनरच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकाव्या. नेहमी आपल्या मूडच्या हिशोबाने वागणे योग्य नाही. धैर्याने पार्टनरच्या गोष्टी ऐकत सल्ला देखील द्यावा.
 
मी आपले आणि आपल्या कुटुंबाचे विचार लादणार नाही
जगात कोणाही दोन व्यक्तींचे विचार आपसात जुळत नाही अशात वाद न वाढवता आपले विचार कोणावरही लादण्याचा प्रयत्न करु नये.
 
मी कधी धोका देणार नाही
धोका किंवा विश्वासघात एका क्षणात नातं नाहीसं करतात. अशात रिलेशनमध्ये असताना पार्टनरला धोका देऊ नये. आपण नात्यात आनंदी नसाल तर वेगळं होण्यासाठी चर्चा करा परंतु नात्यात असताना तिसर्‍या आपल्या नात्यात सामील करणे चुकीचे आहे.
 
मी नेहमी खरं बोलेन
कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. खरं बोलण्याने विश्वास बनतो म्हणून पार्टनरशी खोटे बोलणे टाळावे. कोणतयाही कारणास्तव खोटे बोलणे योग्य नाही. सत्य बोलून विश्वास जिंकावा.