शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (12:58 IST)

पैशांवर प्रेम करणारा पार्टनर ओळखा, आणि योग्य निर्णय घ्या

एकदा प्रेमात पडलं की समोरच्याचा प्रत्येक चूक गोष्टी देखील बरोबर वाटू लागतात. काही दिवस असं धकतंही परंतू जेव्हा गोष्ट लाइफटाइमची असेल तर जरा सावध राहण्याची गरज असते आणि पारखून देखण्याची पण की आपल्या सोबत असलेली व्यक्ती खरंच आपल्यावर प्रेम करते की आपल्या श्रीमंतीवर. तुमचा पार्टनर गोल्ड डिगर तर नाही असे ओळखा-
 
व्यवसाय आणि प्रॉपर्टीत अधिक रस
अश्या लोकांना आपण काय करता, आपली इन्कम किती, नोकरीत असल्यास कोणत्या पदावर आहात, इतर बेनेफिट्स काय तसेच कुटुंबाची संपत्ती किती, कुठे-कुठे प्रॉपर्टी आहे हे सर्व जाणून घेण्यात खूप रस असतो. या व्यतिरिक्त तुम्ही राहत असलेल्या ठिकाणची लोकेलिटी, घर किती मोठं आहे, लाईफस्टाईल बद्दल संपूर्ण चौकशी करणार्‍यांना आपल्यापेक्षा आपल्या पैशांचं जास्त आकर्षण असतं.
 
जवळीक साधणे
एकदाच त्यांना कळलं की आपण त्यांच्या हिशोबाने योग्य आहात तर असे लोक आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या लहान-सहान गोष्टींच कौतुक करतात. आपल्या आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाही.
 
मदत मागणे किंवा खर्च करवणे
आपण कुठल्यातरी समस्येत अडकले असून सध्या पैशांची गरज असल्याचे दाखवतात. इमोशनली गुंडाळून आणि आपला विश्वास जिंकून असे काही सनी क्रिएट करतात की आपण स्वत:हून त्यांना आर्थिक मदतीसाठी धावून जातात. किंवा असे लोक आपल्यासोबत असताना स्वत:ची पर्स उघडतच नाही. मग शॉपिंग असो वा इटिंग सर्वींकडे आपण पेमेंट करताना जाणवतं.
 
नातेवाईक आणि मित्रांशी दुरावा 
असे लोक तुम्हाला कुटुंबाशी आणि मित्रांशी तोडण्याचा प्रयत्न करतात. सतत तुम्हाला जवळ राहून इतर लोकांना भेटू नये अशी परिस्थिती निर्माण करतात. 
 
तर आपली फसवणूक होऊ नये म्हणून डोळे उघडून निर्णय घ्यावा.