पार्टनरचा मूड ऑफ करतात आपल्या या सवयी
एक रिलेशनमध्ये असून आपल्या पार्टनरला आपल्या कोणत्या गोष्टी आवडत नाही हे माहीत करणे कठिण नाही. पुरुषांच्या व्यवहार आणि मूड याचा अंदाज सहज घेता येऊ शकतो. पुरुष स्त्रियांसारखे गुढी नसतात. कोणीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला शंभर टक्के पसंत करू शकत नाही अर्थातच काही गुण असे असतात ज्यामुळे पार्टनर एकमेकांना निवडतात. परंतू निवडल्यावर आपण प्रयत्न करणे सोडले तर पार्टनरचा मूड ऑफ होऊ शकतो आणि परिणामस्वरूप ती व्यक्ती कायम दूर होऊ शकते. म्हणून पार्टनरचा मूड ऑफ होऊ नये याची या प्रकारे काळजी घ्यावी:
सेल्फी
पुरुषांपेक्षा स्त्रियांना सेल्फी काढण्याचं अत्यंत वेड असतं. अशात सतत सेल्फी मूडमुळे पार्टनरचा मूड ऑफ होऊ शकतं. पार्टनरसोबत असला की गर्लफ्रेंडने त्याकडे लक्ष द्यावे अशी त्याची अपेक्षा असते. अशात सेल्फ ओरियंटेड वागणूक दुरी निर्माण करू शकते.
आर्टिफिशियल वागणूक
लक्ष वेधण्यासाठी जोरात बोलणे, जोरात हसणे, पार्टनरला माझा शोना, बाबू असे म्हणणे एखाद्याला धकत असलं तरी नेहमी-नेहमी अशी वागणुकीमुळे मूडची वाट लागते. आणि ही वागणूक स्वभावाविरुद्ध असली तरी नक्की दूर होण्यासाठी पुरेशी आहे.
ओव्हर पझेसिव्ह
आपलं प्रेम वगैरं आहे ते ठीक आहे परंतू त्याने आपल्याशिवाय इतर कुठेही वेळ घालवू नये ही अपेक्षा करणे योग्य नाही. सतत आपल्याकडे अटेन्शन देणे त्यासाठी शक्य नाही परंतू आपल्या या अपेक्षेमुळे तो पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो.
फॅमेली गॉसिप
आपल्या किंवा पार्टनरच्या कुटुंबातील सदस्यांचे अवगुणांची चर्चा किंवा दुसर्यांबद्दल सतत वाईट बोलत राहणे आपल्यातील नकारात्मकता दशर्वतं. याने पार्टनर कधीच खूश होणार नाही. अव्यवस्थित राहणे केस विस्कटलेले, व्यवस्थित कपडे न घालणे, आपल्या व्यक्तिमत्तावर खूप प्रभाव टाकतं. नीरस किंवा कंटाळवाणी वागणूक पार्टनरला स्वत:पासून दूर करते.
तुलना करणे
समोरचा आपल्यासाठी पझेसिव्ह आहे की नाही हे माहीत करण्यासाठी अनेकदा स्त्रिया दुसर्या पुरुषांचे कौतुक करत राहते. परंतू नेहमी- नेहमी असे करणे धोकादायक ठरू शकतं. कारण असा व्यवहार आपल्याला त्यात रस नाही असा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकतो. स्वत:ला लहान समजून मूर्खासारखे वागणे पार्टनरसोबत असला की मूर्खासारखे वागणे, लहान मुलांसारखे हठ्ठ करणे किंवा कोणत्याही गोष्टीत अक्कल न वापरणे हे त्याला एखाद्या वेळी कौतुकासारखे वाटू शकतं परंतू नेहमी अशी वागणूक असली तर कंटाळा येऊ शकतो.