रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

कॉलेज कॅंटीन

पूजा तावरे

डोळ्यात उजाडणारी स्वप्ने, चेहर्‍यावरुन सांडराणं तेज, प्रवाहाविरुद्ध जाण्‍याची ताकत आणि जग बदलण्‍याची जिद्द अशा उधाणलेल्या तरुणाईवर स्वार होऊन केलेला बिनधास्त प्रवास म्हणजेच कॉलेज लाइफ. आणि याचं कॉलेज लाइफमधलं एक धमाल ठिकाण म्हणजे कॉलेज कँ‍टीन. उत्साहाचा, मस्तीचा आणि आनंदाचा माहोल कॉलेज कँटीनमध्ये नेहमीच असतो.

कँटीन म्हटलं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्‍यातील अविभाज्य घटक! कॉलेज कँम्पस, क्राऊड, लायब्ररी, फॅकेल्टीयासह हल्ली कॉलेजच निवड करताना आजकालचे विद्यार्थी कँ‍टीन कसं आहे यालाही महत्व देतात.

फारसं अवाढव्य नसलं तरी, सुटसुटीत व नीटनेटकं असं कँटीन बघताक्षणीच आवडल लागतं. विद्यार्थी कँटीनलाच पहिली पसंती देतात.

कधी चहा-कॉफी किंवा कोल्ड्रींक्सच्या घोटासोबत गप्पांचा फड जमवावासा वाटतो, पेटपूजा करता-करता जनरल्स, असाइनमेंट्स पूर्ण करायच्या. बर्थ डे सेलिब्रेशन वा आपल्या मनातील गुपित आवडत्या व्यक्तीला खास फिल्मी स्टाईलमध्ये सांगायची कँ‍टीन म्हणजे साख जागा.

मराठी पोह्यापासून ते थेट चायनीज भेळपर्यंत सारंकाही एका कँटीनमध्येच मिळते. कॉलेज कट्ट्याप्रमाणे आता कँटीनलाही महत्व आले आहे.

परिस्थितीअनुरुप कँटीनचं वातावरणही बदलत असतं. परिक्षेच्या काळात तर कँटीनमध्ये डिस्कशन बोर्डही येथे चालतात.

कॉलेज कोणतंही असो, कँटीनचा फिल मात्र सगळीकडेच सारखा असतो. उकळणार्‍या चहासोबत खळखळणारं हास्य, दु:खात ओलावलेल्या पापण्या या सार्‍यांची शेअरींग या कँटीनमध्येच होते.

कॉलेज जीवन संपल्यावर अनेक जुन्या आठवणी मनात रेंगाळत असतात. मनाला कायम तरुण ठेणार्‍या या आठवणींमध्ये कँटीनचाही सहभाग असतोच. कँटीनशिवाय कॉलेजलाइफची चटकदार ओली भेळ तयारच होत नाही.