रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

प्रेम दर्शवा अत्ताच्या अत्ता

कित्येकदा व्यस्त जीवनशैलीत पती-पत्नीला एकमेकासाठी पर्याप्त वेळ मिळतं नाही. कामाच्या दबावाखाली आपण फिरायला जाऊ शकतं नाही किव्हा दिवसभर एकत्र वेळ घालवू शकतं नाही तरी काही गोष्टी अश्या असतात  
ज्यांच्या मदतीने आपण आपल्या नात्यात जवळीक वाढवू शकता.

थट्टा करा
कोणत्याही तुरळक गोष्टींमुळे आपसात वाद झाला असल्यास त्या गोष्टीला न ताणता एखादा जोक शेयर करावा. ताण लगेच दूर होईल. अश्या लहान-सहान जोक्ससाठी जास्त वेळ देण्याची गरज नसते पण घरातील वातावरण आनंदित होऊन जातं. कारण थोड्या वेळासाठी का नसो जर आपण बरोबर आहात तर वातावरण आनंदित असलं पाहिजे.

 

सरप्राइज
आपल्या पार्टनरची लहान-सहान मदत करून आपण त्यांना आश्चर्यचकित करू शकता. जसे जेवण्यात काही स्पेशल डिश तयार करून किंवा त्यांचे कपाट आवरून. आपण एखादं अशी गोष्ट ही करू शकता ज्यासाठी आपल्या पार्टनरला खूप दिवसापासून वेळ नसेल मिळतं. याने संबंधात प्रेम निर्माण होईल.


इग्नोर करा
कोणता ही व्यक्ती पर्फेक्ट नसू शकतो. काही न काही कमी प्रत्येकात असते. आपल्या पार्टनरकडून शंभर प्रतिशत पर्फेक्ट असण्याची आशा करणे चुकीचे आहे. जर आपण लहान-सहान गोष्टी दुर्लक्ष केल्यात तर जीवन  
सरळ होईल आणि नाती सुखी.

 

 

प्रशंसा करा
प्रत्येकाला असं वाटतं असतं की सर्वांनी माझी तारीफ करायला हवी. पण दुसर्‍याची तारीफ करण्याचा आपण कधी विचारच करत नाही. वेळेवारी केलेल्या प्रत्येक लहान कामाचीही जर आपण एकदा प्रशंसा करून दिली तर  
पार्टनरला खूप आनंद होईल. आणि चार लोकांसमोर आपल्या पार्टनरच्या वाईट सवयी मांडण्यापेक्षा त्याची स्तुती केली तर मग बघा पार्टनर पुन्हा आपल्या प्रेमात पडतो की नाही? 


जुन्या आठवणींना उजाळा
एखादं गाणं जे आपण लग्नाआधी जवळ बसून गात असाल ते ऐका. जुने अल्बम काढून फोटो पहा. वाटल्यास काही फोटो‍ आणि व्हिडियो मोबाइलमध्ये असू द्या. ज्याने थोडाही वेळ मिळाला की बरोबर बसून पाहू शकाल.