* आपल्या जोडीदारावर प्रेमाच्या कविता लिहा. * आपल्या आवडी-निवडींवर लक्ष केंद्रीत करा. आपल्या जोडीदाराबरोबर याबद्दल चर्चा करा. * जोडीदारासाठी गीत-संगीताच्या कॅसेट खरेदी करा. * जोडीदाराला आपल्याकडून ग्रीटींग कार्ड द्या. * जोडीदाराकडून भेटवस्तू मिळाल्यावर त्यालाही त्याच्या आवडीची भेटवस्तू द्यायला विसरू नका. * घराच्या एखाद्या कोपर्यात लपवून ठेवलेल्या भेटवस्तूबद्दल संकेत द्या. * तुमचा जोडीदारा पत्नी असेल तर रात्री यायला उशीर होईल असे सांगून लवकर घरी जाऊन तिला आर्श्चर्याचा धक्का द्या आणि तिच्यासोबत तिच्या आवडत्या हॉटेलला जेवायला जा. * जोडीदाराला प्रेमपत्र पाठवून एखादा प्रेमळ सल्ला द्या. * जोडीदारासोबत रोमांटिक ठिकाणी फिरायला घेऊन जा. * गुलाबांचा गुच्छ भेट म्हणून पाठवा. * शक्य असेल तर त्याच्या/तिच्या उशीजवळ एक प्रेमळ संदेश ठेवून दिवसाची सुरवात रोमॅंटिक करा. * तिला एक प्रेमळ संदेश द्या. * तिच्यासोबत एखाद्या एकांतस्थळी जा. * आपली चूक स्वीकारण्याची तयारी ठेवा. * आपले विचार मांडण्यासाठी वेळ काढा. * जोडीदारासाठी विशेष लेख लिहा. * व्हॅलेंटाईन डे सोबतच साजरे करा. * तुमच्या आवडत्या स्थळी जाणे पसंत करा. * एकत्र कोणताही खेळ खेळा. * एकमेकांना प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करा. * पण हे करताना आपल्या पालकांना मात्र विसरू नका. त्यांच्याकडेही लक्ष द्या.