शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (14:21 IST)

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर

सुजला डोळा बघून माझा...
बायकोला आली चक्कर,
विचारता मी उत्तरलो...
`स्कूटी 'वालीने दिली टक्कर ।।१।।
 
बायकोने विचारले मला,
"अरे, नंबर पाहिलास गाडीचा?"
मी म्हंटलो" 'नाही पाहू शकलो, 
पण...लाल रंग होता साडीचा' ।।२।। 
 
'गोरा-गोमटा रंग, 
सडपातळ तिचं अंग;
मोकळे होते केस,
मी बघून झालो दंग' ।।३।।
 
'दोन बोटांत अंगठ्या,
लिपस्टिक तिची गुलाबी;
कानात लांब बुगड्या,
घारे डोळे, शराबी!!!'।।४।।
 
'डाव्या गालावर होता,
छोटा काळा तीळ;
गाडी तिची घालत होती,
मोठ-मोठ्याने शीळ!!' ।।५।।
 
वर्णन ऐकून तापला, 
बायकोच्या डोक्याचा मजला...
दुसऱ्याच क्षणी गड्यांनो,
माझा दुसरा डोळाही सुजला।।६।।