साऊथ इंडियन तडका देऊन बनवा चविष्ट Egg Masala Curry
आपल्याला नेहमीच खाण्यामध्ये काही न काही नवीन पदार्थ खावेसे वाटतात. एकाच पदार्थापासून देखील वेगवेगळे पद्धतीने पदार्थ बनू शकतात. जसे की अंडा करी जे आपल्याला देखील आवडते. ती बनवायचे देखील बरीच पद्धती आहे. काही लोक टोमॅटो प्युरीसह एग करी ची ग्रेव्ही बनवतात, तर काही लोक दह्यात कांद्याचा तडका लावून बनवतात.
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एग करी बनविण्याची साऊथ इंडियन रेसिपी, ज्यामुळे अंड्याची चव वाढणार. साऊथ इंडियन तडका देऊन कसे बनवायचे :
साहित्य:
आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पूड, मीठ, हळद, नारळाची पूड, जिरे पूड आणि धणे पूड अंडी, हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो. तेल, कडीपत्ता, मेथीदाणे, कोथिंबीर.
कृती :
सर्वप्रथम आलं-लसूण पेस्ट, लाल तिखटपूड, मीठ, हळद, नारळाची पूड, जिरेपूड आणि धणेपूड एकत्र करावं या सह उकडलेले अंड या मसाल्यात चांगल्या प्रकारे मिसळा. आता या अंडी तेलात परतून घ्या. आणि बाजूला ठेवा. नंतर हिरव्या मिरची आणि इतर मसाल्यांसह कांदा आणि टोमॅटो पेस्ट करून करी तयार करावी. आणि बारीक मऊ अशी पेस्ट बनवावी. आता या पेस्टला एका कढईत काढून परतून घ्या. आता यामध्ये मसाल्यात परतलेली अंडी घाला. आता फोडणी देण्यासाठी तेलात मोहरी, मेथीदाणे अक्खी लालमिर्च, कडी पत्ता, आणि लाल मिरचीची पूड घाला. कोथिंबीरने सजवून घ्या आणि चविष्ट अंडा करी सर्व्ह करा.