गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (07:46 IST)

ऑम्लेटच्या नव्या रेसिपी

* ऑम्लेट विथ मशरूम हा प्रकार ट्राय करता येईल. ऑम्लेट बनवताना त्यात थोडे मशरूम घालता येतील. तसंच मशरू फ्राय बनवून ते ऑम्लेटवर पसरवून खाता येईल.
* ऑम्लेटमध्ये थोडा पालक घालता येईल. ऑम्लेट बनवताना त्यात चिरलेला पालक घाला. पालक ऑम्लेट छान लागेल.
* चेरी टोमॅटोचा वापर करून वेगळ्या पद्धतीचं ऑम्लेट बनवता येईल. चेरी टोमॅटो विथ चीझ ही रेसिपी बनवून ऑम्लेटवर पसरवता येईल.
* ऑम्लेटमध्ये सिमला मिरचीचे तुकडे घालता येतील.मेक्सिकोतले लोक ऑम्लेटमध्ये सिमला मिरची आणि काद्याची पात घालतात. यामुळे तुम्हाला वेगळी चव मिळेल.
 श्रीशा वागळ