सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

Mutton Kofte मटण कोफ्ते

Mutton Gravy
साहित्य- 500 ग्रॅम खिमा, 2 मोठे चमचे खसखस, अंडी 1 किंवा 2 चमचे भाजलेले बेसन, 5-6 कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आले, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 4 चमचे धन्याची पूड, 2 चमचे तिखट, 1/2 वाटी मसाला, 5-6 पाने तेजपान, 1/2 चमचा गोड मसाला, तूप.

कृती- कोफ्ते बनवण्याच्या अगोदर खसखसला स्वच्छ करून धुऊन भिजत ठेवावे. 1/2 तासानंतर त्याला वाटून घ्यावे. कांदा, लसूण, आले यांना सोलून ठेवावे. तूप गरम करावे त्यात तेजपान व कच्च्या मसाल्याची फोडणी टाकावी. चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे. त्यात थोडेसे पाणी टाकूण मीठ व मसाले परतावे. मसाला चांगला परतून झाल्यावर 1/4 भाग मसाला खिम्यात टाकून चांगले एकजीव करावे. आता एका कडाईत तूप तापत ठेवावे व त्यात खिम्याचे भजे तळावे. आता उरलेला मसाल्याची आमटी बनविण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेवावे. 4-5 उकळी आल्यावर तयार भजे टाकून 2-3 उकळी आणून गरमा गरम मटणचे कोफ्ते पोळीसोबत सर्व्ह करावे.