बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चिकन खुबानी

साहित्य : 4 चमचे तूप, 2 चमचे पोर्ट वाइन, मीठ चवीनुसार, 1/2 कप ब्राउन शुगर, 1 कप चिरलेले जरदाळू (खुबानी) 500 ग्रॅम चिकन, 2 सिमला मिरच्या, 10 बदामाचे काप, 10-12 काळे मीरे. 
 
कृती : वाळलेले जरदाळूला 10 मिनिट गरम पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातून पाणी व बिया काढून 1/2 जरदाळूची पेस्ट बनवून घ्या. कढई गरम करून त्यात 1 चमचा तूप गरम करून सिमला मिरच्यांचे लहान लहान तुकडे करून 2 मिनिट फ्राय करावे. मीठ व थोडे बदामाचे काप त्यात मिसळावे. या मिश्रणाला एका प्लेटमध्ये वेगळे ठेवावे.  

बाकी उरलेले तूप गरम करून त्यात ब्राउन शुगर टाकून एकजीव करावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे टाकून हालवावे. त्यात पोर्ट वाइन, मीठ आणि 5-6 काळे मिरे व जरदाळूचे पेस्ट आणि उरलेले जरदाळू टाकावे. थोडं पाणी घालून शिजवावे. नंतर त्यात उरलेले काळे मिरे फोडणी केलेली सिमला मिरचीच्या तुकड्यांमध्ये घालावे व बदामाने सजवून सर्व्ह करावे.