गुरूवार, 2 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

गाजर स्टिक्स

- किर्ती मोहरील

गाजर स्टिक्स दोन अंडय़ांचे पांढरे फेटून बलक ब्रेडचा चुरा
MHNEWS
साहित्य : एकाच आकाराच्या मध्यम-जाडसर अशा तीन-चार गाजरांचे वाफवून उभे काप करावे. दोन अंडय़ांचे पांढरे फेटून बलक, अर्धा कप गव्हाच्या ब्रेडचा चुरा, अर्धा कप साय काढलेल्या दुधाचे ताजे दही, मीठ, मिरपूड चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम गाजरे वाफवून घ्यावी आणि अंडय़ाच्या फेटलेल्या मिश्रणात बुडवावी. त्यात थोडे मीठ घालावे. नंतर गाजरे ब्रेडच्या चु-यात घोळवावीत. नॉनस्टिक पॅन मंद आचेवर ठेवून त्यात दीड चमचा तेल घालावे. तयार गाजराचे काप अलगद भाजावे. खमंग परतावे. घाई करू नये.

दही, मीठ, मिरपूड, जिरेपूड एकत्र करावी. खमंग गाजराचे काप ताटलीमध्ये मांडून त्यावर दह्याचे मिश्रण घालावे. हिरवेगार कोथिंबीर सजवून खायला द्यावे.