- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - मांसाहारी
टोमॅटो सूप-इटालियन
साहित्य : चिकन सूपच्या दोन क्यूब, 4 कप पाणी, 2 कप टोमॅटो ज्यूस, अर्धा टेबलस्पून व्हिनेगर, 4 लवंगा, 3 मिरे, 2 चमचे कोथिंबीर चिरून, दीड चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 टेबलस्पून बटर, एक अंडं उकडून.कृती : टोमॅटोचा रस, पाणी उकळन ठेवावं. चिकन क्यूबचा चुरा करून त्यात घालावा. त्यातच मिरे, लवंगा, व्हिनेगर, मीठ साखर घालून उकळी आणावी. आता दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात बटर पातळ करावं. त्यावर टोमॅटो दोन मिनिटं परतून त्यावर उकळलेलं सूप ओतून एक उकळी आणावी. त्यातच उकडलेलं अंडं सोलून किसावं. कोथिंबीर घालून द्यावं. आवडत असल्यास कोथिंबिरीऐवजी पुदिन्याची तीन-चार पानं चिरून वरून घालावी.