गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

तवा चिकन

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : २५० ग्रेम बोनलेस चिकन, एक छोटा चमचा आले-लसणाची पेस्ट, डावभर तेल, लाल तिखट, मीठ, लिंबू

कृती : चिकनचे अगदी लहान लहान तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावे. त्यांना आले-लसणाची पेस्ट चोळून पाणी न घालता बंद डब्यात ठेवून कुकरमधे वाफवून घ्यावे.

NDND
तव्यावर तेल टाकून तापले की प्रथम जास्तशी लाल तिखटाची पूड व चवीनुसार मीठ घालून त्यात हे आधी शिजवलेले कोंबडीचे तुकडे परतत रहावे. गळसल्यासारखे चुरचुरीत झाले पाहिजेत.मग वर लिंबू पिळून गरमा गरम खायला द्यावे. सोबत कच्च्या कांद्याच्या चकत्या, काकडी, टोमॅटोच्या चकत्या असतील तर फारच छान.

चिकन परतून चांगली झणझणीत तिखट आंबट करायला हवी. म्हणून लाल मिरची पावडर, लिंबू व मीठ सढळ हाताने परंतु योग्य प्रमाणात वापरावे.